पुणे ते सिंगापूर व्हाया मढे घाट
तो गवताचा भारा त्यांनी जमिनीवर टाकला आणि त्यातुन वळवळणारे जनावर बाहेर पडले. घरधन्याने हातातल्या काठीने ते सेकंदात चिरडले. मी सर्पमित्र नाही मात्र या सह्याद्रीत फिरून फिरून या वनचरांची थोडीफार ओळख झाली आहे. ते अर्धमेले होऊन वळवळणारे जनावर मी हाताने उचलले तेव्हा क्षणभर मी सुद्धा हादरलो कारण...... --------------------------------------------------------------------- मागच्या रविवारी मढे घाट,केळद आणि सिंगापूर गावात जाण्याचा योग आला. म्हणला तर हा भाग पुण्यापासून अवघ्या 80 km वर पण इथे जाण्यासाठीचा द्रवीडीप्रणयाम तुमचा घामट काढतोच. ४७ सालापासून इकडे काही गावात जायला रस्ताच नव्हता. सह्याद्रीच्या अगदीच कुशीत वसलेले हे गाव म्हणजे 'सिंगापूर'. गावातली वस्ती मुख्यतः पोटे आणि मोरे कुटुंबांची. गावात घर अवघी बारा ते सोळा. गावातली बहुतांश तरणी पोर पुण्या मुंबई मध्ये स्थायिक झालेली. गावातली उरलेली जुनी खोड आता शेती करत नाही केलाच तर पावसाळ्यात भात नाही तर नाचणी. असे हे सिंगापूर गाव . जगातला देश असलेला अत्याधुनिक सिंगापूर आणि हे आपला कानंदी मावळातलं सिंगापूर यात नावाव्यत...