पुणे ते सिंगापूर व्हाया मढे घाट
तो गवताचा भारा त्यांनी जमिनीवर टाकला आणि त्यातुन वळवळणारे जनावर बाहेर पडले. घरधन्याने हातातल्या काठीने ते सेकंदात चिरडले. मी सर्पमित्र नाही मात्र या सह्याद्रीत फिरून फिरून या वनचरांची थोडीफार ओळख झाली आहे. ते अर्धमेले होऊन वळवळणारे जनावर मी हाताने उचलले तेव्हा क्षणभर मी सुद्धा हादरलो कारण......
---------------------------------------------------------------------
मागच्या रविवारी मढे घाट,केळद आणि सिंगापूर गावात जाण्याचा योग आला. म्हणला तर हा भाग पुण्यापासून अवघ्या 80 km वर पण इथे जाण्यासाठीचा द्रवीडीप्रणयाम तुमचा घामट काढतोच. ४७ सालापासून इकडे काही गावात जायला रस्ताच नव्हता.
---------------------------------------------------------------------
मागच्या रविवारी मढे घाट,केळद आणि सिंगापूर गावात जाण्याचा योग आला. म्हणला तर हा भाग पुण्यापासून अवघ्या 80 km वर पण इथे जाण्यासाठीचा द्रवीडीप्रणयाम तुमचा घामट काढतोच. ४७ सालापासून इकडे काही गावात जायला रस्ताच नव्हता.
सह्याद्रीच्या अगदीच कुशीत वसलेले हे गाव म्हणजे 'सिंगापूर'. गावातली वस्ती मुख्यतः पोटे आणि मोरे कुटुंबांची. गावात घर अवघी बारा ते सोळा. गावातली बहुतांश तरणी पोर पुण्या मुंबई मध्ये स्थायिक झालेली.
गावातली उरलेली जुनी खोड आता शेती करत नाही केलाच तर पावसाळ्यात भात नाही तर नाचणी.
असे हे सिंगापूर गाव .
जगातला देश असलेला अत्याधुनिक सिंगापूर आणि हे आपला कानंदी मावळातलं सिंगापूर यात नावाव्यतिरिक्त एकाच साम्य आहे ते म्हणजे यांचा आकार जगाच्या नकाशावर सिंगापूर देखील अगदीच बारीक आणि हे सिंगापूर म्हणजे तर ठिपकाच. याच्या शेजारीच रायलिंग पठाराच्या खालच्या अंगाला पहुडलेलं अजून एक गाव म्हणजे मोहरी. नाव मोहरी अगदीच सार्थ असे नाव . मोहरीच्या दाण्यासारखा !!
एरवी कोणाच्या खिजगणितीतही नसलेली हि गाव तोरणा ते रायगड डोंगर यात्रा करणाऱ्यांना चांगलीच माहिती आहेत कारण कोकण्यात उतरणाऱ्या नाळेच्या तिन्ही वाटा (बोरहट्टयाची नाळ, सिंगापूरची नाळ आणि बोचूघोळची नाळ) याच गावाच्या आजूबाजूने खाली कोकणात उतरतात . त्यायोगे या वनवासीचा पाहुणचार घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही तरी इथपर्यंत जाण्यासाठी मात्र चांगलीच पायपीट करावी लागते.
इथे कसे जावे ,अंतर किती आहे ,कुठली एसटी जाते हे सगळे वर्णन करणे मुळात या पोस्ट चा हेतूच नाही. त्याची माहिती आज सर्वत्र उपलब्ध आहे नसेलच मला संपर्क करा. काही हेतू असलाच तर तो हा इथे असलेले दारिद्य , आयुष्याची क्षणभंगुरता , सह्याद्रीची बिकटता, इथे टिकून राहिलेला निसर्ग , जैव वैविध्य आणि आपण एक उत्क्रांती झालेली प्रजाती म्हणून माज करत या सगळ्याच करत असलेला विध्वंस !! परवा तो लिओनार्डो बोलला तेव्हा लगेच सगळे हवामानबदल , पर्यावरण वगैरे बद्दल बोलू लागले , अचानक जाणीव वगैरे झाली पुळका वगैरे आला पर्यावरणाचा वगैरे वगैरे .......
तर,
वेल्हापासून पुढे केळद आहे अंदाजे 20 किमी अंतरावर. इथून पुढे एक किमीवर मढे घाट लागतो. मढे घाट म्हणजे पुणे जिल्ह्याचे टोक इथे पुणे संपते रायगड जिल्हा सुरु होतो.
इथे सकाळी सकाळी आम्ही पोहचलो,.
इथून खाली डाव्या हाताला असणारा एक रस्ता थेट कोकणातल्या कर्णावडी ,वाकी या गावात उतरतो !
या घाटवाटेने उतरताना भेटलेला एक अस्सल धनगर !!
"धोंडुबा कचरे" बारीक अंगकाठी, रापलेला रंग , खप्पड गाल,
सालं या लोकांचा आयुष्य कष्ट बघितले कि स्वतःचीच कीव यायला लागते ।
कारण ज्याला आपण धाडस किंवा ट्रेक वगैरे म्हणतो ते या लोकांची रोजची जगण्याची धडपड आहे।
हा माणूस सकाळी 7 वाजता घरातून एक कप चहावर निघालेला. पायात साधी वहाण, आम्हाला भेटला तेव्हा दुपारचे 11 वाजलेले. ५ तास सलग उन्हाचे तडाखे झेलत सह्याद्रीचा उभा अखंड चढ हा माणूस पोटात काही नसताना चढत होता. काय त्याचा stamina आणि काय त्याची ऊर्जा !
मनातल्या मनात त्याला साष्टांग दंडवत घातला !
मधल्या नाळेत भेटला सोपस्काराचा राम राम घातला, स्वतःचं माणूस धर्माला जागून पाणी विचाराला तेव्हा हा धनगर म्हातारा एकदम गहिवरून आला म्हणलं तुम्हाला माणुसकी हाय वगैरे वगैरे , बसून आमच्या छान गप्पा रंगल्या तिथलेच प्रस्तर खंड आमच्या आसन झाली, तो रानकथा सांगत राहिला आणि मी समृद्ध होत राहिलो. पुढच्या टाईमाला मुक्कामाला या असा आमंत्रण देऊन तो मार्गस्थ झाला !!
कृतकृत्य झालो भरून पावलो !!
गावात फारशी वस्तीच नसल्याने घरातल्या आजींनाच रायलिंग चा रस्ता दाखवण्याची विनंती केली. त्यांनी लावून दिलेल्या वाटेनुसार आम्ही रायलिंग पठार ,लिंगाणा दर्शन करून आलो. पठारावर दूरपर्यंत पसरल वाढलेले गवताचे कुराण उन्हात चमकत होते !! उन्हाचा तडाखा असल्यामुळे साप किरड्याचे भयच नव्हते. परत येऊन सरपंचाच्या अंगणात विसवताच होतो तेवढ्यात आमच्याच मागून घराचे मालक डोक्यावर गवताचा मोठा भारा घेऊन आले. हे गवत थेट पठारावरून आणावे लागते हे अंतर अदमासे दीड ते अडीच किमी असेल. तो गवताचा भारा त्यांनी जमिनीवर टाकला आणि त्यातुन वळवळणारे जनावर बाहेर पडले. घरधन्याने हातातल्या काठीने ते सेकंदात चिरडले. मी सर्पमित्र नाही मात्र या सह्याद्रीत फिरून फिरून या वनचरांची थोडीफार ओळख झाली आहे. ते अर्धमेले होऊन वळवळणारे जनावर मी हाताने उचलले तेव्हा क्षणभर मी सुद्धा हादरलो कारण या माणसाने त्याच्या डोकावरच्या गवतात साक्षात 'घोणस' ( Russel Viper) वाहून आणली होती. स्वतःच्याच डोक्यावर स्वतःचा मृत्यू वाहून आणणारे हे वनवासी त्यांचे दुर्गम कष्टप्रद आयुष्य आणि जीवन मरणाची अनिश्चितता मनाशी घोळवत गाडी सुरु केली आणि त्या धुळीच्या लाल फुफाट्यावरून आमची पल्सर पुन्हा सिंगापूरचा घाट चढू लागली परतीच्या मार्गावर,
या रायलिंग पठारावरून लिंगाणा फार सुरेख दिसतो। रायलिंग पठारापासून समोर अवघ्या काहीशे फुटावर लिंगाणा ताठ उभा आहे मात्र तिथवर पोहचता येत नाही कारण मध्ये असलेली सरळसोट काही हजार फुटाची दरी . या लिंगणाच्या मागे असलेला रायगड, मध्ये वाहणारी काळ नदी, कोकणातली दापोली , पाने हि इटुकली पिटुकली गाव या दरीत पाय सोडून न्याहालण्यासारखी दुसरे सुख नाही.
या दुर्गभ्रमंतीचा परमोच्च सुखाचा बिंदू म्हणजे इथून थेट दिसणारे रायगडावरील जगदीश्वराचेे मंदिर आणि महाराजांची समाधी !! हे दिसायला निसर्गाची कृपादृष्टी तर हवीच आणि इथे पर्यंत पोहचण्याची एक इच्छाशक्तीही हवी।
विशेष नोंद करण्याचे करायची ते सोबतच्या साथीदाराची या डोंगर यात्रेला गौरवी सोबत होती, हा ट्रेक 'रेकी ट्रेक' असल्याने जास्त लोकांना घेऊन जाणे शक्य नव्हते
ईथे ऊन आणि पाऊस दोन्ही भयंकर असतात.. मी दोन्हीचा अनुभव घेतलाय..
ReplyDeletest
ReplyDeleteधन्यवाद, तुमच्या सारख्या पर्यटकांमुळे माझं गाव लोकांच्या समोर येतंय. नाहीतर राजकीय पक्ष्यांचे नेते ५ ते १० वर्षातून एकदाच येतात.. पुण्यापासून ८० किमी वर असं एक गाव असेल आणी तिथे असं जीवन असेल यावर लोकांचा विश्वास बसत नाही..
ReplyDelete