Posts

Showing posts from May, 2016

खांडस ते भोरगिरी (भाग १)

Image
“सूर्याच्या आगीत भाजून निघालेला पण अंगावर फ़ुलपाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्यचिन्हे- रुपाची, नादाची व सुगंधाची- धारण करणारा, चैत्रसखा वैशाख. या पेटलेल्या वैशाख वणव्यात आम्हाला वेध लागले होते ते भोरगिरी वरून खांडसला उतरायचे. असे उरफाटे बेत तडीला न्यायला लोकही तशीच उरफाटी लागतात. या सह्याद्रीवरच्या कपारीत घुमण्यासाठी, हि भटकंती करण्याची ताकद माझ्या पोटाऱ्या आणि मांड्यांमध्ये कायम राहू इतकेच काय ते मागणे !! जंगल मला आवडता , भावते !! ते मला कळतं, वाचता वगैरे येत हा काही माझा दावा नाही. किल्ल्याच्या ओढीने, नादाने फिरता फिरता या सह्याद्रीच्या पायवाटांवर हळूहळू अरण्यवाटा येऊन मिळाल्या त्यातून थोडीफार ओळख होत आहे !! महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आज जी काय थोडीफार जंगले उरली आहेत त्यातलाच एक देखणा आणि विस्तृत जंगलाचा पट्टा म्हणजे ही भीमाशंकरचे जंगले , राजगुरुनगरपासून सुरु होऊन थेट कल्याण मुरबाड लोणावळा आणि काळसूबाईपर्यंत पसरलेला !! हे लिहित असताना कालच्याच बुद्ध पौर्णिमेला भीमाशंकरला प्राणी गणती झाली. बिबट्याचे आस्तित्व इथे पुन्हा जाणवले. इथल्या जंगलात वाघ होता. अगदी ९० ते ९५ पर्य...