Posts

Showing posts from April, 2020

"करली" कथा

Image
पापलेट आणि बांगडा खाऊन खाऊन कंटाळलेला मी नवीन मस्यावताराच्या शोधात कायम असतोच आणि मागे एकदा निवतीच्या किनाऱ्यावर काही मच्छीमारांच्या गप्पा ऐकताना 'करली'च्या ख्याती कानावर पडली होती. तेव्हापासून करलीच्या शोधात होतो, दापोली पट्ट्यात आले, की हर्णेच्या मासळी बाजारात एक तरी चक्कर व्हायलाच हवी. इथल्या मासळी बाजारात आल्यावर गरजेचं नसता की तुम्ही मासे खरेदी करायलाच हवे. पण इथे येणारी ताजी, स्वच्छ माशांची रास बघितली, तरी दिल खुश हो जाता आहे. समुद्रातले मासे आपल्या पिढीला तरी नक्की पुरतील अशी खात्री पटते. इथली घमघम नाकात भरून घेतली की वर्षभर पुरते. क्रेटच्या क्रेट भरून ट्रकमध्ये ओतली जाणारी ती मासळी बघून मन तरी तृप्त होतेच. बाकी इथे आपले मासे आपण निवडावेत, इथल्या कोळीणी तुमची मापं काढण्यात अस्सल पटाईत !! तेव्हा त्याच्याशी घासाघीस करून आपले मासे आपण निवडून, पारखून घेण्याची मजा निराळी !! त्यामुळे या मस्यप्रेमपायी हर्णेला वर्षातून किमान एक चक्करही होतेच. मात्र, गेल्या काही वर्षात इथल्या मासळी बाजाराचा रूप पालटत आहे हे नक्की, इथल्या बाजारात तुम्ही फेरफटका मारला, की तुम्हाला हमखास जाणवत...