"करली" कथा
पापलेट आणि बांगडा खाऊन खाऊन कंटाळलेला मी नवीन मस्यावताराच्या शोधात कायम असतोच आणि मागे एकदा निवतीच्या किनाऱ्यावर काही मच्छीमारांच्या गप्पा ऐकताना 'करली'च्या ख्याती कानावर पडली होती.
तेव्हापासून करलीच्या शोधात होतो,
तेव्हापासून करलीच्या शोधात होतो,
दापोली पट्ट्यात आले, की हर्णेच्या मासळी बाजारात एक तरी चक्कर व्हायलाच हवी. इथल्या मासळी बाजारात आल्यावर गरजेचं नसता की तुम्ही मासे खरेदी करायलाच हवे. पण इथे येणारी ताजी, स्वच्छ माशांची रास बघितली, तरी दिल खुश हो जाता आहे. समुद्रातले मासे आपल्या पिढीला तरी नक्की पुरतील अशी खात्री पटते.
इथली घमघम नाकात भरून घेतली की वर्षभर पुरते. क्रेटच्या क्रेट भरून ट्रकमध्ये ओतली जाणारी ती मासळी बघून मन तरी तृप्त होतेच.
बाकी इथे आपले मासे आपण निवडावेत, इथल्या कोळीणी तुमची मापं काढण्यात अस्सल पटाईत !!
तेव्हा त्याच्याशी घासाघीस करून आपले मासे आपण निवडून, पारखून घेण्याची मजा निराळी !!
त्यामुळे या मस्यप्रेमपायी हर्णेला वर्षातून किमान एक चक्करही होतेच.
मात्र, गेल्या काही वर्षात इथल्या मासळी बाजाराचा रूप पालटत आहे हे नक्की, इथल्या बाजारात तुम्ही फेरफटका मारला, की तुम्हाला हमखास जाणवते ते म्हणजे इथे पूर्वी माश्यांची जी काही व्हरायटी मिळायची ती बहुतेक संपली आहे.
पापलेट, सुरमई, कोळंबी, हलवा हे चार प्रमुख मासे, क्वचित बांगडा याशिवाय वेगळा असा मासा बाजारात दिसतंच नाही.
शार्कपासून ऑक्टोपस, करली, कुर्ली, लॉबस्टर,,म्हाकुल,बोंबील अशी प्रचंड variety इथे मी स्वतः बघितली आहे. पण गेल्या काही वर्षात माशांचे हे बाकीचे प्रकार दिसणं बंदच झालेले असावा.
पण, सध्या हर्णे म्हणजे पापलेट आणि सुरमई इतकेच काय ते मासे !!

त्यामुळे 'करली' मासा मिळवणं हे बऱ्यापैकी मुश्किलीचा काम होता. बाजारात जाऊन जाऊन जे काही कोळीणींचे चेहरे ओळखीचे झाले होते, त्यातल्याच एका अनुभवी मावशींना पकडून त्यांच्याकडून 'करली' मिळवण्याचा वायदा पक्का करून घेतला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा "करली"च्या शोधात मावशींना शोधत आम्ही बाजारात पोचलो. अख्ख्या बाजारात निवांत फेरफटका मारून माश्यांचा अंदाज घेत मावशीकडे गेलो, तेव्हा त्यांनी " फार मोठा नाही घावला ,छोटाच आहे म्हणून एक सव्वा फूटभर लांबीचा "करली" टोपलीतून काढून समोरच्या लाकडी पाटावर ठेवला.
लाल भडक डोळ्याचा,सडपातळ शरीरयष्टीचा,चंदेरी रंगाचा लांबसडक मासा आकर्षक नक्कीच होता. करली माशाला काटीसुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये या माशाचा नाव "Dorab wolf-Herring" असे सांगितले जाते.
करलीसोबत तीन गलेलठ्ठ पापलेटसुद्धा उचलले. योग्य किंमतीत सौदा पक्का केला.
करली साफ करायला घेतला तेव्हा कोळीण मावशींनी विचारले, "भाच्या करली कसा खातात ते माहिती ना" ? हा मासा चवीला साऱ्या समुद्रात भारी पण खातात ते माहिती असेल तरच !!
मी : नाही ब्वा, जसे बाकीचे मासे खातात तसाच खाणार ना ?
मावशी काहीच बोलल्या नाहीत, मोठ्याने हसत फक्त कपाळाला हात मारून घेतला; तेव्हा करली प्रकरण काही तरी अवघड दिसतंय याची कल्पना आली.
मासे आचाऱ्याकडे नेऊन दिले, अर्धा करली फ्राय आणि अर्ध्याचा कालवण सांगितलं. एका करली चे चांगले 8,9 मोठाले तुकडे झाले होते.
फ्राय करलीची प्लेट आली, माश्याचा पहिला तुकडा तोंडात टाकला तेव्हा करली प्रकरण कळलं.

माश्यात काटे होते का काट्यात मासा होता हेच कळतं नव्हता. प्रचंड काट्यात अडकलेला तो नाजूक मासा हळूहळू सोडवत तोंडात टाकताना चांगलीच दमछाक झाली. काटे सोडले तर माशाची चव मात्र निव्वळ अप्रतिम होती. या चवीला कशाची उपमा द्यायचीच, तर ओल्या किसलेल्या खोबऱ्यापेक्षा मऊ आणि जिभेवर विरघळणारा तो मस्यावतार म्हणजे साक्षात समुद्राची कृपाच !! तब्बल अर्धा पाऊण तास करली बरोबर झगडल्यावर मासा संपला. बाजूच्या प्लेटमध्ये काट्याच्या खच पडला होता. बरं, करलीचा काटासुद्धा माश्यासारखाच नाजूक, इतका नाजूक सहज जाऊन घशात अडकायचा आणि तेव्हा कोळीण मावशींनी कपाळावर हात का मारला याचा उलगडा झाला.
पण त्यादिवशी जाता जाता मावशी एक मोलाचा सल्ला देऊन गेल्या होत्या, माश्याचे जितके काटे जास्त तितका मासा चविष्ट !!
हर्णेच्या बंदरात बाकीचे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाला कारण पुण्यामुंबैकोल्हापुराच्या टुरिस्टना हे असले मासे खाणे त्रासदायक वाटत, त्यापेक्षा पापलेट सुरमई लैच सोप्पंय !
उचलला मासा टाकला तोंडात की झाला !
माश्यांचा गिऱ्हाईक नाही त्यामुळे या माश्यांची अवाकच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
जे काही असे वेगळे मासे येतात ते मुंबईच्या मार्केटला रवाना होतात.
तिथे एखादा अट्टल खवैया त्यांची वाट बघत असतो.
अशी साठा उत्तराची करली माशाची कथा पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली !

×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×-×
ता.क.
हर्णेच्या बंदराकडे जाताना गावात शिरल्यावर उजव्या हाताला कायम काही कोळीणी मासे विकायला बसलेल्या दिसतात.त्यांच्याकडे बघून आधी वाटायचं बंदरात अख्खा बाजार भरलाय माशांचा आणि या बायकांकडून कोण घेणार मासे ?
नंतर कळलं की शहरांकडून येणारे लोक पापलेट सुरमईच्या मागे वेडे आहेत, पण स्थानिक मात्र याच कोळीणकडून मासे घेतात. कारण भरपूर काटे असणारे पण चवीला उत्कृष्ट असणारे मासे याच कट्ट्यावर मिळतात.

Comments
Post a Comment