Posts

Showing posts from 2017

कुर्डुगडाचा चकवा

Image
 इथे सह्याद्रीच्या मांडीवर बसलेले कुर्डूपेठ हे अवघ्या सात घरांचे गाव लागते, इथे प्यायचे पाणी मिळू शकते , मातीने लिंपलेल्या भिंती , गवताने साकारलेली छपरे , शेणाने स्वच्छ सारवलेली अंगणे तुम्हाला क्षणभर रेंगाळायला भाग पाडतात. इथे क्षणभर टेकून पुढची मार्गक्रमण करावी. या कुर्डूपेठ गावाची वस्ती महादेव कोळ्यांची आहे. महाराष्ट्रातल्या या आदिवासी जमातीचे वैशिष्ट म्हणजे हे आदिवासी प्रामुख्याने डोंगराळ भागाला चिकटून राहतात. या लोकांचे दैनंदिन जीवन आपल्याला रोमांचकारी , संघर्षपूर्ण वाटू शकेल मात्र ही लोक असल्या कसल्याच अाविभार्वात जगत नाहीत. जगापासून दूर त्यांच्या आयुष्यात ते रममाण असतात. रविवारी पाय काय घरी टिकत नाही, अप्पाची पुस्तक वाचून वाचून गुगल मॅप पालथा घालून झाला की हे सह्यासखे खुणावायला लागतात. राजगड , तोरणाच्या वाऱ्या करून झाल्या ,तिकडे झालेली गर्दी आता बघवत नाही सहनही होत नाही, तेव्हा आपसूकच पावले आडवतेवरच्या दुर्गस्थळांकडे पावले वळू लागतात ,  कुर्डूगडाचा हे दुर्गलेण ताम्हिणीच्या कुशीत वसलेले आहे. पुण्याकडू...

सिंगापूरची बिकट वाट वहिवाट

Image
भोरला पोहचलो तरी अजिबात पुण्याला परतावसे वाटत नव्हते. भोरच्या स्टॅंडवरच  कॉफीचे पेले रिचवत, मन अजूनही त्याच दर्याखोर्यात रेंगाळत होते.  गेल्या दोन दिवसात तुडवलेल्या रानवाटा,  उतरलेल्या घाटवाटा, रायलिंग पठारावरची हळवी करून जाणारी संध्याकाळ, सिंगापूरच्या नाळेतील  क्षणभर   ठोका चुकवणारी घसरडी वाट, काळ नदीचे अद्भुत पात्र, वाळणडोहाचा चमत्कार, मोरे दाम्पत्याची आपुलकी , पाठीवर वाहिलेले जड पित्ठू, भरून आलेल्या पोटऱ्या , सिंगापुरातून मध्यरात्री पहिलेले काळेशार चांदणं........ पुढचे काही आठवडे तरी पुरणार होते... सिंगापूर गावात जाणारा रस्ता ज्याची सुरुवात भट्टी गावाच्या पुढील कुसारपेठ खिंडीतून होते. सिंगापूर.....  राजगडावरच्या एका लोभस संध्याकाळी, पद्मावती मंदीरासमोरच्या पटांगणात रंगलेल्या गप्पांमध्ये एक अनामिक वाटसरू माहिती देऊन गेला या वाटेची. म्हणतात ना (म्हणजे मीच म्हणतो) आडवाटेवरच्या वाटा आडरानात कळतात तशातला हा प्रकार...तेव्हापासून या वाटेची स्वप्न पडू लागली. ते दिवस डोंगर भटकंतीच्या इव्हेंटचे झाले नव्हते. ट्रेकिंगचे सोहळे आणि सण झाले नव्हते...

देवराईची रानभुली

Image
या निसर्गचित्रात आम्ही मंत्रमुग्ध होऊन हरवून जात असतानाच समोरच्या फणसाच्या झाडामागे जाणवलेली पल्लेदार आणि लांबलचक सळसळ देवराई जिवंत करून गेली. इथे पायाखालची जमीन ही जमीन नव्हतीच ती पर्णशय्या बनली होती.  काही सहस्रकांपासून तिथे ती पाने ,फांद्य साचून त्या तिथेच रुजल्या होत्या. निसर्गाचे चक्र तिथे काटेकोरपणे पाळाले जात होते. अर्थात इथे पडलेली वाळकी फांदीही ना उचलण्याचा नियमच होता तो प्राचीन काळापासून चालत आलेला. इथे राहणारे वनवासीदेखील बिनचूकपणे तो पाळत होता. निसर्ग आणि माणसाचे सहजीवन इथे सहज फुलले होते. रानात वसलेले वेताळ आणि आवजाई जोडीने साक्षीदार होते या सहजीवनाचे !! ---------------------------------------- घाटातील दृश्य त्या जंगलात बरेच वेळा जाणे झाले आहे. उन्हाळा, पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतुंमध्ये इथल्या वाटांवर मुक्त भटकंती करण्याची संधी मिळाली होती. रात्री अपरात्री हे जंगल अनुभवलं होता, पहिल्यांदाच इथे आलो होतो तेव्हा वाट चुकून या जंगलात हरवलो होतो. एकदा उन्हाळ्यात एकटाच अख्खा घाट चढून आलो होतो फक्त नवीन घेतलेल्या कॅमेऱ्याचा पहिला फोटो इथुनच काढायचा होता म्हणून !!! ...

मेंगाईसोबतची रात्र

Image
तोंडावरून पांघरूण घेऊन पडलेला मी झोपेच्या सीमेवर रेंगाळत असतानाच पायापासून ते थेट डोक्‍यापर्यंत काहीतरी हळुवार सरकत गेल्याची जाणीव मला झाली आणि क्षणभर खाडकन भानावर आलो. पांघरुणाच्या आतूनच मी कानोसा घेतला. त्या भयाण अंधारात अर्थातच पांघरून बाजूला करण्याची हिंमत त्यावेळी त्या क्षणी तरी माझ्यात नव्हती. आजूबाजूला काहीही हालचाल नव्हती. झालेल्या गोष्टीला भास मानत पांघरुणाच्या आतमध्ये मी मात्र आता टक्क जागा झालो होतो.  --------------------------- वर्ष २००७ असेल , सह्याद्रीचा वारं नुकतंच कानात शिरलं होता. लोहगड, राजगड, तुंग, तिकोना सर झाले होते, पावसाळा सुरू झाला होता, जुलैचा महिना होता, नगरच्या महावीर कलादालनात पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. ट्रेकिंग ग्रुप सोबतचे ट्रेकिंग, ब्लॉग, इंटरनेट हे सगळंच (आर्थिकदृष्ट्या) आवाक्‍याबाहेर असल्यामुळे पुस्तके हेच संदर्भ ग्रंथ मानून डोंगरयात्रांचे बेत जमत होते,  या पुस्तक प्रदर्शनात प्र.के.घाणेकरांचे "भटकंती किल्ल्यांचे" हे पुस्तक दिसले, खिशात पैसे नसायचे ते दिवस. जितके होते त्यात जमवून पुस्तक खरेदी केले. घरी आल्या आल्या तोरणा किल्ल्याचे पान...

अंधारबनाचा अंधार

Image
अंधारबनाच्या वाटेवरील कुंडलिकाची अजस्त्र दरी , समोर दुरवर दिसणारा भिरा डॅम '"अंधारबनला धोका आहे'', 'हा भाग धोकादायक आहे जाऊ नका', असे संदेश सोशल मिडीयावर फिरायला लागले त्यामुळे आपसूकच या जागेबद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले. हा जागा नक्की का बदनाम होत आहे हे प्रत्यक्ष जाऊन बघण्यासाठी अंधारबनला जाऊन धडकलो. इथे येणारे पर्यटक नक्की काय करतात आणि स्थानिक गावकऱ्यांशी बोलून अंधारबनात नक्की काय धोका आहे हे जाणून घ्यायचा प्राथमिक हेतू होता.   ----------------------- कुडूगडाच्या ट्रेकसाठी पहाटेच निघून ताम्हिणीच्या मार्गाने मार्गस्थ झालो होतो. डिसेंबरचे दिवस असल्याने हवेत चांगलाच गारठा होता. निवाच्या पुढे पोचल्यानंतर मागून एका गाडीचा हॉर्नमुळे थांबलो. गाडी थांबली, काच्या खाली गेल्या आणि गाडीच एकट्याच बसलेल्या एका विशी बावीशिच्या मुलाने हातातल्या मोबाईलवर गुगल मॅप दाखवत विचारले ये देवकुंड कहा है ? त्याला सांगितले की अजून बरेच लांब जावे लागणार. पूर्ण घाट, विळ्याची midc ओलांडावी लागणार... असे मी वाक्‍य पूर्ण करत असतानाच तो म्हणाला देवकुंड त...