भीमाशंकर ते खांडस (शिडीची वाट )

भीमाशंकरच्या घनदाट जंगलातली 'अरण्यकन्या' ' शिडीचा घाट ' !! थरारक , चित्तथरारक , अवघड , बिकट , रोमांचकारी असा काय काय विशेषण लावता येणारा हा घाट उतरायचा म्हणजे नजर उंचीला स्थिरावरलेली स्थिर हवी , पाय भक्कम हवेत आणि पोटाऱ्याच्या स्नायूंमध्ये ताकद हवी आत्मविश्वास हवा मात्र फाजील नसावा , माज तर बिलकुल नसावा , सह्याद्री उग्र आहे त्यामुळे इथे "चुकीला माफी नाही"उंची , पाणी असले कसले फोबिया असलेले शहरी मावळे इथे अगदीच कुचकामी !! भीमाशंकर वरून खांडस ला उतरण्याच्या दोन प्राचीन घाटवाटा आहेत !! एक आहे गणपती घाटाची दुसरी शिडीच्या घाटाची . गणपती घाटाची वाट गणपती सारखीच तुंदिल तनू !! रमत गमत जाणारी हि वाट अगद सहज तुम्हाला खांडस ला आणून सोडते ना चुकण्याची शक्यता ना हरवण्याची . भरगच्च जंगलातून जाणारी हि वाट सुखावह आहे . या वाटेवर माणसांचा वावरही तुलनेने कमी असल्याने इथल्या शांततेत हे अरण्य बरंच काही बोलून जाते अर्थात तुमची ऐकण्याची इच्छा हवी . 8, 10 लोकांच्या कवेत मावणार नाहीत इतक्या मोठ्या खोडाची झाडे इथे जिवंत इतिहास घेऊन वर्षांनुवर्षे उभी आहेत . भीमाशंकर मंदि...