अंधारबनाचा अंधार

अंधारबनाच्या वाटेवरील कुंडलिकाची अजस्त्र दरी , समोर दुरवर दिसणारा भिरा डॅम '"अंधारबनला धोका आहे'', 'हा भाग धोकादायक आहे जाऊ नका', असे संदेश सोशल मिडीयावर फिरायला लागले त्यामुळे आपसूकच या जागेबद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले. हा जागा नक्की का बदनाम होत आहे हे प्रत्यक्ष जाऊन बघण्यासाठी अंधारबनला जाऊन धडकलो. इथे येणारे पर्यटक नक्की काय करतात आणि स्थानिक गावकऱ्यांशी बोलून अंधारबनात नक्की काय धोका आहे हे जाणून घ्यायचा प्राथमिक हेतू होता. ----------------------- कुडूगडाच्या ट्रेकसाठी पहाटेच निघून ताम्हिणीच्या मार्गाने मार्गस्थ झालो होतो. डिसेंबरचे दिवस असल्याने हवेत चांगलाच गारठा होता. निवाच्या पुढे पोचल्यानंतर मागून एका गाडीचा हॉर्नमुळे थांबलो. गाडी थांबली, काच्या खाली गेल्या आणि गाडीच एकट्याच बसलेल्या एका विशी बावीशिच्या मुलाने हातातल्या मोबाईलवर गुगल मॅप दाखवत विचारले ये देवकुंड कहा है ? त्याला सांगितले की अजून बरेच लांब जावे लागणार. पूर्ण घाट, विळ्याची midc ओलांडावी लागणार... असे मी वाक्य पूर्ण करत असतानाच तो म्हणाला देवकुंड त...