कुर्डुगडाचा चकवा
इथे सह्याद्रीच्या मांडीवर बसलेले कुर्डूपेठ हे अवघ्या सात घरांचे गाव लागते, इथे प्यायचे पाणी मिळू शकते , मातीने लिंपलेल्या भिंती , गवताने साकारलेली छपरे , शेणाने स्वच्छ सारवलेली अंगणे तुम्हाला क्षणभर रेंगाळायला भाग पाडतात. इथे क्षणभर टेकून पुढची मार्गक्रमण करावी. या कुर्डूपेठ गावाची वस्ती महादेव कोळ्यांची आहे. महाराष्ट्रातल्या या आदिवासी जमातीचे वैशिष्ट म्हणजे हे आदिवासी प्रामुख्याने डोंगराळ भागाला चिकटून राहतात. या लोकांचे दैनंदिन जीवन आपल्याला रोमांचकारी , संघर्षपूर्ण वाटू शकेल मात्र ही लोक असल्या कसल्याच अाविभार्वात जगत नाहीत. जगापासून दूर त्यांच्या आयुष्यात ते रममाण असतात.
रविवारी पाय काय घरी टिकत नाही, अप्पाची पुस्तक वाचून वाचून गुगल मॅप पालथा घालून झाला की हे सह्यासखे खुणावायला लागतात.
राजगड , तोरणाच्या वाऱ्या करून झाल्या ,तिकडे झालेली गर्दी आता बघवत नाही सहनही होत नाही, तेव्हा आपसूकच पावले आडवतेवरच्या दुर्गस्थळांकडे पावले वळू लागतात ,
कुर्डूगडाचा हे दुर्गलेण ताम्हिणीच्या कुशीत वसलेले आहे.
पुण्याकडून माणगावला जाताना विळे midc ओलांडली कि निझमपूरच्या अलीकडे किलोमीटर अंतरावर कि ..... फाटा लागतो तिथून जिते गावाकडे जाणारा रस्ता आपल्याला कुर्डूगडकडे घेऊन जातो. फाट्यापासून अदमासे 10 किलोमेंटरवर जितें गाव आहे, पूर्वी जितेपासून एक रस्ता डोंगरधारेवरून कुर्डूगडावर जायचा मात्र हा रस्ता लांबच असल्याने इथे आता फारशी वहिवाट उरलेली नाही. पानशेतच्या मागच्या दापसरे गावातून एक रस्ता जितें गावात उतरतो या रस्त्यात ठिपठिप्या घाट लागतो. पण ठिपथिप्या घाटाची माहिती फारशी कोणाला नाही तसेच माहितगार माणूस सोबत असल्याशिवाय इथून जा ये करता येत नाही इतका हा भाग दुर्गम आहे. पानशेतच्या शेवटी पसरलेल्या मोसे खोऱ्यातून लिंग्या घाटाची घाटवाट थेट कुर्डूगडपशी येते. लावसाच्या मागे असलेले धामनओवोळ गावापर्यंत बस येते तिथून उतरून एक वाट कुर्डूगडावर येते, मात्र आम्ही उबर्डे ची धोपट वाट निवडली.
उंबर्डी या किल्ल्याच्या पायथाच्या किल्ल्याला चालत जावे लागायचे , हे अंतर चार किलोमीटर चे आहे आता उंबर्डीपर्यंत गाडी जाते, उंबर्डी गाव म्हणजे चाहुबाजूनी सह्यदृच्या कटाळभिंती आणि त्याच्या मधोमध पायथ्याला हे गाव,
इथून उजवीकडची वाट कुर्डूगडाचा घेऊन जाते. कुर्डूगडाला जाणाऱ्या वाटेवर विजेचे खांब चढवले असल्यामुळे हे विजेचे खांब खूण म्हणून पकडायचे आणि सरळ डोंगर चढायला सुरुवात करायची.
कुर्डूगडाचे दुसरे नाव विश्रामगड असेही आहे, रायगडच्या घेऱ्यात हा किल्ला वसलेला आहे, पूर्वीच्या काळी ताम्हिणी घाटाच्या स्वराक्षणार्थ हा किल्ला टेहळणीचे काम करत असणार, राजधानीच्या रायगडच्या अडीअडचणीच्या वेळेला कुर्डूगडावरची शिबंदी मदतीला धावत असणार, आजमितीला कुर्डूगडावर किल्ला म्हणावा अश्या दोन तटबंड्या शिल्लक आहेत , बाकी किल्ला झपाट्याने ढासळत आहे, गडावर जायची वाटाही बऱ्याच ठिकाणी अरुंद, घसरडी बनली आहे.
तर विजेच्या खांबाचा निशाणा धरून तुम्ही पहिला डोंगर चढताना बरीच दमछाक होते, चढ सगळं छातीवरचा असल्याने तुमच्या शाररिक क्षमतेचा नक्कीच कस लागतो.
आम्ही हिवाळ्यात किल्ला चढत असल्याने उन्हाचा त्रास तितकासा जाणवत नव्हता मात्र उन्हामुळे वाटेवरचे सगळे गवत वाळून गेल्यामुळे घसारा झाला होता, त्यामुळे पायाखालची वाट घसरडी बनली होती।
हा पहिला डोंगर चढून आपण एक पठारावर पोहचतो , इथून डावीकडे कुर्डूगडाचा सुळका डोकावू लागतो.
इथल्या सपाटीवर चालत गेलात कि इथे सह्याद्रीchya मांडीवर बसलेले कुर्डूपेठ हे अवघ्या सात घरांचे गाव लागते, इथे प्यायचे पाणी मिळू शकते , मातीने लिंपलेल्या भिंती , गवतानी साकारलेली छपरे , शेणाने स्वच्छ सारवलेली अंगण तुम्हाला क्षणभर रेगाळयाला भाग पाडतात. इथे क्षणभर टेकून पुढची मार्गक्रमण करावी. या कुर्डूपेठ गावाची वस्ती महादेव कोळ्यांची आहे. महाराष्ट्रातल्या या आदिवासी जमातीचे वैशिथ्य म्हणजे हे आदिवासी प्रामुख्याने डोंगराळ चिकटून राहतात. या लोकांचा दैनंदिन जीवन आपल्याला रोमांचकारी , संघर्षपूर्ण वाटू शकेल मात्र ही लोक कसलाच अविभार्वत आणत नाही. जगापासून दूर त्यांच्या आयुष्यात ते रममाण असतात. कुर्डूपेठ गावात कुर्डाइ देवीचे मंदिर आहे.
![]() |
कुर्डूपेठेतील अलिशान निसर्गमहाल |
![]() |
उत्सुक नजरा !! |
या कुर्डूपेठ गावापासून कुर्डूगड हा हाकेच्या अंतरावर आलेला असतो, गाव पार करून गेलात समोर कुर्डूगडाचा सुळका तुम्हाला खुणावू लागतो. इथून उजवीकडे जाणारी वाट धामणओहोळ गावाकडे जाते. अर्थात हे आम्हाला आधी माहिती नव्हते.हि वाट कळली कारण कुर्डूपेठ वरून निघाल्यानंतर सरळ वाट सोडून आम्ही धमनोवोळ ची तिरपगाडी वाट पकडली याचा एकाच कारण म्हणजे गप्पा,
गप्पांच्या नादात आम्ही मूळ वाट सोडली आणि गच्च जंगलात शिरलो दुपारची वेळ होती जंगल दाट होते त्यामुळे वाट हाविहाऊशी वाटत होती त्यामुळे मूळ वाटेकडे दुर्लक्ष्य करून गडावर पोहचायला अजून एखादी वाट असेल अशा आशेपायी आम्ही याचा वाटेचा मोह धरून चालत राहिलो,तासभर चालल्यानंतर मात्र कुर्डू गडाचा सुळका नाहीसा झाला आणि आणि कुर्डूगाड्सच्या शेजारी असलेल्या डोंगराला धरून समांतर जाऊ लागलो तेव्हा मात्र शंकेची पाल चुकचुकली. तोपर्यंत तास दिडतास गेला होता. सह्याद्रीमध्ये फिरतांना या अशा वाटांवर कोणी वाट चुकला तर भेटेल अशी आशा बाळगणं बऱ्याचदा वेडेपणाचे ठरते . त्यामुळे एक तर तुमची सहयाद्री ची भौगोलिक रचना मुळात कळायला हवी आणि दुस्रे म्हणजे गावातून निघताना रास्ता, ओळखीच्या खाणाखुणा नीट विचारून घ्याव्यात आणि त्या कटाक्षाने पाळाव्यात.
इथे वेळ गेल्यावर आम्ही मागे फिरण्याचा निर्णय घेतला आणि झपाट्याने माघारी फिरलो,
![]() |
अवैध जंगलतोड !!! |
हातात वेळ कमी असल्याने कुर्डूगड ते धमनोवोळ चा ट्रेक पुढच्या वेळेसाठी राखीव ठेवून आम्ही कुर्डूगडाकडे मोर्चा वळवला. डावीकडची उभी वाट वळणे वळणे घेत कुर्डूगडाचा उध्वस्त प्रवेशद्वारात आणून उभी करते.आजमितीला किल्ल्यावर काहीही अवशेष शिल्लक नाहीत,
![]() |
तटबंदीचे अवशेष !!! |
छताचा भागाची झीज होऊन हि गुहा विस्तारत गेलेली आहे मात्र छताचा भाग कोसळून जमिनीवर दगडांचा खच पडला आहे त्यामुळे गडावर मुक्कामासाठी हि गुहा कुचकामी ठरते.
गुहा |
तटबंदीच्या समोर असलेल्या खिंडीतून वर चढला कि एक प्रचंड मोठ्या आकाराची खिडकी दिसते ,
प्रतारशीळा एकमेकांवर पडून या नैसर्गीक खिडकीची रचना झाली आहे. या खिडकिंमधून समोर पसरलेले कोकण आणि सदाहरित जंगलाचा पट्टा सुरेख दिसतो. इथे या जागी क्षणभर विसावला कि सह्याद्रीची अजस्त्रात जाणवू लागते, इथली गूढ अगम्य पण हवीहवीशी वाटणारी शांतता इथेपर्यंत यायचे कष्ट सार्थकी लावतात.
या निसर्गाच्या खिडकीचे फोटो सुरेख मिळतात.
कुर्डूगडाचा हि सगळी वैशिष्ट्ये टिपत टिपत हि आम्ही पुन्हा कुर्डूपेठेत पोहचलो.
कुर्डूपेठेच्या मधून विजेचे खांब जरी गेले असले तरी पेठेत मात्र वीज नाहीच,
पलीकडे मात्र लवासाला वीजपुरवठा करण्यासाठी डोंगरावर दिसणारा, खास उभारलेला एकच विजेचा खांब लक्ष्य वेधून घेतो.
![]() |
अस्मादिक |
सर जोड शब्द,व्याकरण, यात बरीचं गरबड आहे.चेक करा ..धन्यवाद
ReplyDelete