Posts

Showing posts from 2018

रतनगड ते हरिश्‍चंद्रगड कात्राबाईच्या साक्षीने....

Image
रतनगड ते  हरिश्चंद्रगड ट्रेकचा भव्य पॅनोरमा , उजव्या हाताचा कलाडगड , मागे घनचक्कर-कात्राबाई-आजोबा पर्वतांची रांग सह्याद्रीच्या वाटा धुंडाळण्याचे हे वेड अंगवळणी पडत चाललंय. एकदा एखाद्या नवीन गडकोटाची, घाटवाटेची वारी घडली, की अजून नवनवीन वाटा गवसतात. मग या घाटवाटा खुणावू लागतात. मनात सतत रुंजी घालणाऱ्या या घाटवाटा, हे दुर्गसखे जोपर्यंत सर होत नाही तोपर्यंत ध्यानी,मनी तेच दिसू लागते. रतनगडावरून एक वाट कात्राबाईच्या खिंडीमार्गे मुळा नदीच्या स्वर्गीय खोऱ्यात उतरते आणि तिथून ती कलाडगडाला वळसा मारून थेट भटक्‍यांच्या पंढरीत हरिश्‍चंद्रगडला पोचते. खूप वर्षापूर्वी या भागात फिरताना या वाटेबद्दल ऐकले होते. या निमित्ताने नकाशावर ही वाट पाहिली होती, गुगलवरच्या फोटोमध्ये अनुभवली होती, पण प्रत्यक्षात या वाटेला आमचे पाय लागले नव्हते. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ते लागले. एक दणदणीत ट्रेक नावे लागला आणि कष्ट सार्थकी लागले. रतनगडाच्या पायथ्याचे अमृतेश्वर मंदिर रतनगडाच्या पायथ्याचे मुक्कामाची उत्तम सोय असलेले मारुती मंदिर महिनाभरापासून या ट्रेकचा कट शिजत होता आणि तीन, चार दिवसाचा ...

कासवांचे गाव

Image
पहाटेची शांत वेळ... समुद्रावरचा थंडगार खारा वारा अंगाला बोचत होता. समुद्राच्या लाटांची गाज आसमंतात भरुन राहिली होती. अजून पुरेसे उजाडले नव्हते तरी समुद्रावर हळूहळू माणसं गोळा होऊ लागली होती. माणसं म्हणजे लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळीच होती. वेगवेगळ्या प्रांतातून , प्रदेशातून आलेली माणसं ती, काही तर परदेशातून पण आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता दाटून राहिली होती. किनाऱ्यावर उभारलेल्या खोपटामध्ये दहा-बारा टोपल्या गोणपाट घालून झाकून ठेवल्या होत्या. त्याच्या भोवती जाळीचे कुंपण उभारले होते. त्याच्या आजूबाजूला माणसे कोंडाळे करुन आपपल्या जागा आडवून बसून राहिली होती. तेवढ्यात गावातले कार्यकर्ते लगबगीने आले आणि तडक खोपटात शिरले. तेथे झाकलेल्या टोपल्या ते एक एक करुन उघडून पाहू लागले... खोपटाबाहेरच्या माणसांची उत्कंठा शिगेला पोचली होती. टोपल्यांखाली नेमके दडले तरी काय होते ? शे-दोनशे माणसं भल्या पहाटे किनाऱ्यावर कशाल जमली होती ? दोन टोपल्या उघडल्या तरी पदरी निराशाच पडली... तिसरी टोपली उघडली आणि खोपटाबाहेरच्या माणसांचा एकच गलका उडाला. तिसऱ्या टोपलीखालून इवली इवलीशी ...

गड गुदमरतोय

Image
प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेली पाण्याची टाकी, दारूच्या बाटल्यांचा खच, खरकट्या पत्रावळी या सगळ्याच्या गराड्यात अडकलेला हरिश्‍चंद्रगड हे महाराष्ट्रातल्या गडकिल्लांच्या दुरावस्थेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या कचऱ्यामुळेच हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी ट्रेकर्समध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडकिल्ल्यांवरचा वाढत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी नाही झाले तर बाकीच्या किल्ल्यावरही मुक्कामास बंदी येऊ शकते. एकुणात ट्रेकर्सचे लाडके आणि हक्काचे असलेले हे गडकोट त्यांच्यापासून दुरावणार का ? अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्‍चंद्रगड हा भटक्‍यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे. गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्‍चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्य...