काहीसे वैयक्तिक स्वतःला माणूस म्हणतो म्हणून

सदर जागेतील शब्दांच्या रचनेस कविता म्हणून संबोधण्याचे धारिष्ट्य अजुन तरी माझ्या ठायी नसल्याने सदरहू लिखाण हे अमूर्त प्रकारातील समजावे हे विनंती
धन्यवाद

ना तुझ्यावर ना तिच्यावर

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर,वळणावर,

स्वार्थी,निस्वार्थी सर्वांवर,
स्विकारलेल्या ,लाथडलेल्या,कवटाळलेल्या,आवळलेल्या,
वासना,वासल्याच्या काठावर,
ओथंबलेल्या,थबकलेल्या आणि रोखलेल्या,
सावध,बेसावध,क्वचित,प्रचलित,निरागस,निर्ढावलेल्या,
मोह,मद,मद्य,माया,मदनिका यांच्या प्रभावाखालील
क्षण,काळ,प्रहरात झालेल्या
सापेक्ष,निरपेक्ष,पौगंड, बाल्य व् तारुण्यातील,
संप्रेरकांच्या प्रेमळ,निरागस,कपटी ,फसव्या मृगजलाचा
मी पूर्ण सन्मान राखून
आयुष्याच्या खेल नाबाद खेळत राहीन



तुझ्यासाठी चार शब्द लिहताना... 
पौर्णिमेचा चंद्र नको, 
हिरवागार निसर्ग नको, 
भावनांचा भार नको,

वेदनेचा तार नको,

शब्दांचा भडीमार नको,
भाषेचा डौल नको.
जटील अवघड शब्द नको अर्थाचे अनर्थ नको
थरथरणारे हात नको
रम्य संध्याकाळ नको
निसटलेले नाजूक क्षण नको
मनापासूनची दाद नको
ओढवलेले वाद नको
चुकलेला ठोका नको
आयुष्याचा गमक नको,
जुळवलेले यमक नको,
हे खरडलेले शब्द आणि ते वाचताना तुझ्या डोळ्यातले दोन थेंब...
इतकं पुरेसं आहे मला 
तुझ्यापर्यंत माझ्यातला मी 
नेमका पोहोचवायला...

Comments

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

कासवांचे गाव

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission